नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत; सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे
मुंबई : विरोधक वैफल्यग्रस्त असल्याचे विधान काल मुख्यमंत्र्यांनी केले. पण मला त्यांना इतकेच सांगायचे आहे की,नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे.असे प्रत्यत्तर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
सरकारचं कर्तृत्व शून्य आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बरोबर अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढला.गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर शनिवार-रविवार बॅंका उघड्या ठेवून यांनी कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती.असेही विखे यांनी सांगितले.ऐन अधिवेशनाच्या अगोदर सरकारला असे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेलं कोण आहे? हतबल कोण आहे? याची जाणीव होते.असा टोलाही त्यांनी लगावला.