राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाने झाली मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून न दिल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे.

मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

Previous articleनैराश्यग्रस्त विरोधक नाहीत; सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे
Next articleमराठी अनुवाद प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी