अनुवादाची व्यवस्था वेळेवर न झाल्याबद्दल राज्यपालांकडून नाराजी

अनुवादाची व्यवस्था वेळेवर न झाल्याबद्दल राज्यपालांकडून नाराजी

मुंबई :  राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या अभिभाषणाचे मराठी मध्ये अनुवाद न झाल्याच्या घटनेची गंभीर दखल खुद्द राज्यपालांनी घेतली असून, त्यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी पत्र लिहून अभिभाषणाच्या मराठी अनुवादाची व्यवस्था वेळेवर न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करून चुकीसाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तातडीने पत्र पाठवून विधानमंडळ येथे झालेल्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी मराठी अनुवाद वाचनाची व्यवस्था न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गोष्टीची अत्यंत गांभीर्याने दाखल घ्यावी तसेच चुकीसाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये केली आहे.

Previous articleमराठी अनुवाद प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
Next articleआमचा अभ्यास अधिवेशनात दाखवून देवू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here