सरकारच्या विरोधात आक्रमक व्हा

सरकारच्या विरोधात आक्रमक व्हा

उध्दव ठाकरे यांचे आमदारांना आदेश

मुंबई: आज पासुन सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधीपक्ष आक्रमक झाले असतानाच आता सत्तेत सहभागी असणा-या शिवसेनेने सरकारच्या विरोधात दंड थोपटण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनामध्ये आक्रमक व्हा असे आदेश खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना आज झालेल्या बैठकीत दिले.

स्वबळाचा नारा देणा-या शिवसेनेने राज्य सरकारला खिंडीत पकडण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक व्हा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आज दिले. विधानभवनाजवळ असलेल्या ‘ट्रायडंट’ या हॉटेलमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडली.रत्नागिरीतीलनाणार प्रकल्प, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्यावर सरकारला कोंडीत पकडण्याच्या सूचनाही उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. नुकत्याच झालेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये करण्यात आलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. शिवसेनेने आज घेतलेल्या भूमिकेमुळे फडणवीस सरकारपुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Previous articleआमचा अभ्यास अधिवेशनात दाखवून देवू
Next articleमुंबईतील गिरण्यांच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी समितीच्या माध्यमातून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here