कर्जमाफीवरून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

कर्जमाफीवरून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी देण्यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा लाभ शेतक-यांना मिळावा यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढ देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सरकारने लाभार्थी शेतक-यांची आकडेवारी फसवी असल्याने कर्जमाफी तात्काळ द्यावी अशी मागणी करत विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातले त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

कर्जमाफी आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार दिली असतानाही पुन्हा ३१ मार्च पर्यत शेतक-यांना अर्ज भरण्याची मुदतवाढ दिल्याने ही योजना फसल्याचे दिसून आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत दिवसभराचे कामकाम रद्द करून यावर चर्चा करण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदरचा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. गेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावासह आकडेवारी जाहीर करत त्याची यादी सर्व विरोधकांना देण्याचे जाहीर केले होते. ती यादी आजपर्यंत मिळालेली नसल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केला. त्यामुळे सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. या गोंधळातच
अध्यक्षांनी कामकाज उरकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आक्रमक विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होवून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे प्रथम २० मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

 

Previous articleमुंबईतील गिरण्यांच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी समितीच्या माध्यमातून
Next articleराज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here