महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरु आहे

महाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरु आहे

धनंजय मुंडे

मुंबई : मराठी भाषा दिन साजरा करीत असतांना आज मराठी भाषा विभागाला पूर्णवेळ सचिव नाही,भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत.मंत्रालयातील सचिव,आय.ए.एस. , आय.पी.एस. अधिकारी मराठीत टिपणे इंग्रजीत टाकतात. मुख्यमंत्री अनेक कार्यक्रमात हिंदी, इंग्रजी भाषेत बोलतात. मराठीची उपेक्षा सुरु असल्याची खंत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानपरिषदेत सभापती रामराजे निंबाळकर यांनी मांडलेल्या ठरावावर बोलतांना त्यांनी राज्यात होत असलेल्या मराठी भाषेची उपेक्षा

“ पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी`
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी“

या कवी सुरेश भट यांच्या या कवितेतील चार ओळी वाचून दाखत मांडली.

काल राज्यपालांच्या अभिभाषणावेळी त्यांचे भाषण गुजराती मधून अनुवादित होत असल्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता , त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तुम्हाला सर्वत्र धनाजी संताजी दिसतात असा शब्दप्रयोग केला होता, त्यावर मराठीची बाजू घेतली म्हणून तुम्हाला आम्ही मुघल वाटतो का असा पलटवार करत तावडे यांचे शब्द रेकॉर्ड वरून काढून टाकण्याची मागणी केली.

Previous articleगळ्यात पाटया लावून पंचनामे करता,शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का ?
Next articleमहाराष्ट्रातच मराठीची उपेक्षा सुरु आहे