आर्थिक मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या
शरद पवार यांची मागणी
मुंबई : सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
केवळ मागास शेतकऱ्यांनाच आरक्षण देण्यात यावे असे पवार स्पष्ट केले.
दिवसेनदिवस शेती व्यवसाय कमी होत चालला आहे. ८२ टक्के शेतक-यांकडे २ एकरापेक्षा कमी शेती आहे तर ७० ते ७२ टक्के शेतजमीनीला पाणीच नाही. असे पवार यांनी सांगून आर्थिक निकषाबरोबरच शेती व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी म्हणून आरक्षण द्या अशी मागणी केली. कसलीही तयारी न करता सरकारने कर्जमाफीच्या योजनेची घोषणा केल्याने लाभार्थी आणि निधीचा आकडा दररोज कमी होत आहे,असा टोला पवार यांनी लगावला. एससी, एसटी आणि ओबीसी यांना घटनेने आरक्षण दिले आहे. त्याला धक्का लागता कामा नये. असे त्यांनी सांगितले.