कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास गुन्हा नोंदवणार

कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास गुन्हा नोंदवणार

रणजित पाटील

मुंबई : कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात समुपदेशन करुन सुधारणा करणाऱ्या या समाजातील सुशिक्षित तरुणांना आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल,तसेच कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास याबाबत गुन्हा नोंदविला जाईल व कार्यवाही करण्यासाठी सर्व पोलीस स्थानकांना सूचना देण्यात येतील.असे गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

पाटील पुढे म्हणाले, कौमार्य चाचणी करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारीवरुन पुणे पोलीस स्टेशनमार्फत चौकशी करण्यात आली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा विरुद्ध तक्रार करण्यास संघटना पुढे आल्यास त्यांना संरक्षण देण्यात येईल. तसेच याबाबत स्वयंस्फूर्तीने कार्यवाही करण्याबाबत पोलीसांना सूचना देण्यात येतील. कौमार्य चाचणीबाबत जाहीर वाच्यता केल्यास याबाबत गुन्हा नोंदविला जाईल व कार्यवाही करण्यासाठी सर्व पोलीस स्थानकांना सूचना देण्यात येतील. एका महिन्याच्या आत बैठक घेण्यात येवून दर तीन महिन्यांनी याबाबतचा आढावा घेण्यात येईल,महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंद, बंदी व निवारण) आदी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Previous articleलोटे परशुराम येथील नविन सामुहिक सांडपाणी प्रक्रिया संयत्रणा उद्या एमआयडीसीच्या ताब्यात देणार
Next articleलाळ्या-खुरकत लसीकरण मोहिमेतील विलंबासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार