अजित पवार म्हणाले….तुमचं वाटोळं होईल !
मुंबई : राज्यातल्या जनावरांना लाळ-खुरकत रोगाची लागण होऊ नये यासाठी देण्यात येणाऱ्या लसीत भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकार वर टीकेची झोड उठवली. अजित पवार आपल्या भाषणात एवढे संतप्त झाले की, त्यांनी सरकारला शापच दिला..मुक्या जनावरांचा तुम्हाला तळतळाट लागेल, तुमचं वाटोळं होईल अशा शब्दात दादांनी आपला राग व्यक्त केला.
गेल्या दोन वर्षात राज्यातल्या २ कोटी दहा लाख जनावरांना लाळ- खुरकत रोगाची लस दिली नसली गेल्याच्या मुद्यावर विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्षवेधी दाखल केली होती. या लक्षवेधी वर सभागृहात जोरदार चर्चा झाली
यावेळी या लसीच्या टेंडर मध्ये भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. लसीची सात वेळा निविदा का काढली. पशु संवर्धन सचिवांनी संबंधित विभागाच्या आयुक्तकांना सूचना देऊन ही निविदा मंजूर करण्यात आल्या नाहीत. हे संशयास्पद असल्याचे सांगून पवार यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.मात्र पशुसंवर्धन राज्यमंत्री अजून खोतकर यांनी केवळ उच्च स्तरीय समिती कडून चौकशी करू असे सभागृहात सांगितले.मात्र यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे सभागृहक्त गोंधळ झाला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्तिथीत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहातील पेच सोडवण्याचा प्रयत्न करत ही लक्षवेधी राखून ठेवण्याची विनंती केली..