नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही

शरद पवारांचा पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल

मुंबई: साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा थेट शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारी धोरणांवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील हल्लाबोल मोर्चाला ते संबोधित करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाऊन सामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीशी पक्ष उभा असल्याचा संदेश दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या जिल्ह्यांतही हल्लाबोल यात्रा पोहोचेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

हल्लोबोल मोर्चाला संबोधित करताना ते म्हणाले की, पीएनबी घोटाळ्याचा परिणाम असा की, आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेत गेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही. सध्या रेशन दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊ लागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्य म्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सरकारचा काय उपयोग, असा सवाल त्यांनी केला. देशात महागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीण झालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगार मिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे

Previous articleसरकारच्या फसवणूकीच्या गर्तेतून जनतेला बाहेर काढायला हवे
Next articleअनाथ बालकांना मिळणार विभागातच प्रमाणपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here