सुरुवात तुम्ही केलीत पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार !

सुरुवात तुम्ही केलीत पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार !

धनंजय मुंडे यांचा इशारा

मुंबई : काल न्यूज १८ या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिला. तर न्यूज १८ लोकमत वाहिनीवर हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.

मी या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. मी बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे. आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची बाहेर क्लिप काढणार आहे असा इशारा मुंडे यांनी थेट सरकारला दिला. ही लक्षवेधी सुचना २०१६ मधिल आहे. जर मी पैसे घेतले असतील तर २०१७मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला असा सवाल मुंडे यांनी केला

सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलोय. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप माझ्यावर केले जात आहे. मी काल दुपारपासून माझ्या शासकीय निवासस्थानी होतो मात्र या चॅनलच्या एकाही प्रतिनिधीने मला याबाबत मी विचारणा केली नाही याचे दुखः वाटतं.ऐवढ्या क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरच खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते.
मी जे काही करतो ते इमानदारीने करतो बदनामी करत नाही. जर इमानदारीने काम करूनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतोयया सभाग्रुहात मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणले आहे कदाचित हाच राग मनात असल्याने माझ्यावर हे आरोप केले गेले असेही मुंडे म्हणाले.

तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या मी त्या अग्नीपरीक्षेला सामोरे जाईल. मला निलंबीत करा मला काही परवा नाही मात्र मी आतापर्यंत या सभागृहात जेवढे आरोप केलेत त्याची खुली चौकशी व्हायला हवी अशी मागणी मुंडे यांनी केली.मी म्हटल्याप्रमाणे आज पासून भ्रष्टाचार उघड करण्याची मालिका सुरू करत आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने माझी बांधिलकी ही राज्यातील १२ कोटी जनतेशी आहे त्यामुळे मी माझा लढा सुरु झाला आहे. असे सांगत धनंजय मुंडे, धनंजय गावडे, प्रमोद दळवी, न्यूज १८ या चॅनलच्या संपादकाचीही नारको टेस्ट झाली पाहिजे, दळवी कोणाकोणाला भेटला, कोणाच्या कॅबिनला गेला त्याचीही नारको टेस्ट व्हावी अशी मागणी मुंडे यांनी केली.

“जितना समझ रहे हो.. उतना आसान नहीं हूँ मैं .तुम लाख कोशिशें करो मुझे बदनाम करने की.. मैं जब भी बिखरा हूँ.. दुगनी रफ्तार से निखरा हूँ”..असा शेरही मुंडे यांनी सुनावला

Previous articleपरिचारक आणि धनंजय मुंडे प्रकरणामुळे विधानसभेत गदारोळ
Next articleधनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here