उद्योगपती गणपतराव मोरगे यांचे निधन

उद्योगपती गणपतराव मोरगे यांचे निधन

नांदेड : मराठवाडा भूषण आणि शारदा कन्स्ट्रक्शन्सचे सर्वेसर्वा उद्योगपती गणपतराव मोरगे ( वय ५७ वर्षे ) यांचे कर्करोगाच्या आजारामुळे निधन झाले.

मराठवाडा भूषण आणि शारदा कन्स्ट्रक्शन्सचे सर्वेसर्वा उद्योगपती गणपतराव मोरगे हे गेल्या ५ वर्षापासून कर्करोगाने आजारी होते.गणपतराव मोरगे यांच्या निधनामुळे एक कर्तबगार उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना प्रतिष्ठेच्या मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गणपतराव मोरगे यांचे पार्थिव आज शनिवारी सकाळी ७ वा. पासून दुपारी १२ वाजेपर्यंत “शिवालय” बंगला, भाग्यनगर ,नांदेड येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे .भोसी ता.भोकर जि.नांदेड येथे शनिवारी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous articleआता झेडपी कर्मचा-यांची तीन वर्षानंतर बदली होणार !
Next articleपरिचारक यांना पाठिंबा देणा-यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here