माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा
मुंबई : माजी मंत्री आणि काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांना अस्वास्थ्यामुळे शुक्रवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात असून, सध्या त्यांची प्रकृती प सुधारत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.पतंगराव कदम यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन विश्वजित कदम यांनी केले आहे.
माजी मंत्री पतंगराव कदम गेल्या महिन्यापासून आजारी आहेत. त्यांना परवा शुक्रवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.समाज माध्यमांवर कदम यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट पोस्ट व्हायरल झाल्यामुळे पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांसह हितचिंतकांमध्ये देखील अस्वस्थता पसरली होती. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र विश्वजीत कदम यांनी एक प्रसिद्धपत्रक काढून पतंगराव कदम यांची प्रकृती ठिक असल्याचे सांगितले आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही आवाहन त्यांनी केले आहे.