वैजापूर, जामनेर नगरपरिषदेसह चार नगरपंचायतीसाठी ६ एप्रिलला मतदान
मुंबई : वैजापूर , जामनेर या नगरपरिषदेसह कणकवली, गुहागर,देवरूख आणि आजरा या नगरपंचायतीसाठी येत्या ६ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने वैजापूर, जामनेर या नगरपरिषदेसह, कणकवली,गुहागर, देवरूख आणि नवनिर्मित आजरा या नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाची आज घोषणा केली असून, येत्या ६ एप्रिल रोजी सकाळी ७: ३० ते सायंकाळी ५: ३० या वेळेत मतदान घेण्यात येणार असून , या ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. १२ ते १९ मार्च या कालावधीत नामनिर्देशनपत्रे ११ ते दुपारी ३ या वेळेत स्विकारली जातील.तर ७ एप्रिल रोजी निकाल घोषित केला जाईल.