महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

खा. सुप्रिया सुळेंची मागणी

मुंबई : महिला शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत केली.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिला शिक्षणासाठी खर्ची घातले होते. त्यामुळे फुले दाम्पत्यास “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात यावा, अशी खा. सुळे यांनी करून हा पुरस्कार जाहीर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा गौरव ठरेल, असेही सुळे यांनी म्हटले आहे.यासंदर्भात सुळे यांनी ट्विट केले आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला काल सोमवारपासून सुरूवात झाली. त्यावेळी खा. सुळे यांनी सभागृहात ही मागणी
केली.

Previous articleसिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
Next articleपरिचारकांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची शिवसेनेची मागणी