परभणी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आठ गटविकास अधिकाऱ्यां वर अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई
ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांचे आश्वासन
मुंबई : स्वच्छ भारत अभियानात ३ ते ४ कोटी रुपयांची अनियमितता करणा-या तत्कालीन परभणी जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी खोडवेकर व जिल्ह्यातील इतर ८ गटविकास अधिकारी यांच्यावर चालू अधिवेशन संपण्यापूर्वी अंतिम कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ठ आश्वासन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज विधानपरिषदेत दिले.
वरील दोषी अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी आ बाबजानी दुराणी , विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नातुन केली. त्यावेळी मंत्र्यांनी हे उत्तर दिले.