अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली

अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.हे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

राज्य शासनाने आज चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांची लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर वनमथी सी. यांची नंदूरबार जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त योगेश म्हसे-पाटील यांची बदली महाराष्ट्र राज्य सहकार पणन फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.

Previous articleमुंडे भाऊ – बहिण एकत्र आले तर परमेश्वराला सर्वात मोठी पूजा घालेल 
Next articleनारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!