भुजबळांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू देणार नाही

भुजबळांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू देणार नाही

गिरिश बापट यांचे आश्वासन

मुंबई : विविध आरोपाखाली आरोपाखाली तुरूंगात असलेले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांना खासगी रूग्णालयात उपचार देण्याच्या मुद्द्यावरून आज दुसऱ्या दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांखलीच खडाजंगी झाली. संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर या विषयावर अखेर पडदा पडला.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी छगन भुजबळ यांच्या उपचारावरून झालेल्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. एका आरोपीच्या उपचाराबाबत चर्चा करताना जे. जे. रूग्णालयापेक्षा खासगी रूग्णालये चांगली आहेत, असे सभागृहात सांगून सरकारी रूग्णालयांचा अवमान करण्यात आला, असे ते म्हणाले.सरकारी रूग्णालयावर अथवा जे. जे. वर अविश्वास व्यक्त करण्यात आला नाही. छगन भुजबळ यांना तपासणीसाठी रांगेत थांबावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, परिवहनमंत्री रावते यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. या गदारोळामुळे सभापतींनी १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

खासगी रूग्णालयातील उपचाराची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली. तर, सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही. गोंधळ घालत कामकाज रेटण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला. भुजबळ आरोपी असले तरी त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. कसाब, तेलगीसारख्या लोकांना चांगले उपचार मिळतात मग भुजबळ यांना का नाही, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. सभापतींनी आपल्या दालनात बैठक घ्यावी आणि यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना, भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या तब्येतीची योग्य काळजी घेण्यात येत आहे, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात सांगितले.

Previous articleनारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!
Next articleगुटखा विक्री विरोधात अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here