एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करणार

एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करणार

मुंबई : गृह प्रकल्पामध्ये घरे देण्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर कठोर कारवाई करण्यासाठी व ग्राहकांना न्याय देण्याच्या दृष्टीने एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

मुंबईतील एन.डी.डेवकॉन प्रा.लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या संचालकांनी ग्राहकांची केलेल्या फसवणूकीबाबतचा प्रश्न सदस्य किरण पावसकर यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात संबंधित आरोपीला अटक केली आहे. त्यांची १८ खाती सिल केली आहेत. दोन आरोपी परदेशात गेले आहेत. त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्राहकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने एम.पी.आय.डी. कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे.

गृह प्रकल्पात फसवलेल्या ग्राहकांना भाडेतत्वावर जागा देण्याबाबत किंवा रखडललेले ग्रह प्रकल्प म्हाडाकडे हस्तांतरित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सदस्य प्रविण दरेकर यांनी विचारलेल्या उप प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Previous articleमंत्रीपद सोडेन पण नाणार प्रकरणी जनतेच्या पाठीशी !
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जगातील सर्वाधिक उंचीचेच होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here