आणीबाणीच्या काळात लढा दिलेल्या सत्याग्रहींना पेन्शन

आणीबाणीच्या काळात लढा दिलेल्या सत्याग्रहींना पेन्शन

-महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई  : आणीबाणीच्या काळात लोकशाहीकरिता लढा देऊन १ महिन्यापेक्षा अधिक बंदीवास सोसलेल्या सर्व सत्याग्रहींना निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला असून निवृत्तीवेतनाच्या रकमेची आकडेवारी या महिन्याअखेर निश्चित करण्यात येईल, असे निवेदन महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद तसेच विधान सभेत आज केले.

निवेदनात माहिती देण्यात आली आहे, १९७५ ते १९७७ या कालावधीत देशात आणीबाणीच्या कालावधीत बंदीवास सोसलेल्या सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना निवृत्तीवेतन (पेन्शन) देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी मंत्री मंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने बंदीवासाच्या कालावधीनुसार द्यावयाच्या पेन्शनबाबतच्या निर्णय घेतले आहेत.

पाटील म्हणाले की, अन्य राज्यामध्ये पाच -दहा वर्षापूर्वीच अशाप्रकारे कारावासात राहिलेल्या व्यक्तींना पेन्शन सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही अशी पेन्शन योजना सुरू व्हावी, अशी ब-याच काळापासून जनमानसाची मागणी होती. त्यानुसार अशा सत्याग्रहींना पेन्शन देण्याचे निश्चित केले आहे.    या निर्णयानुसार एक ते सहा महिने कालावधीमध्ये ज्यांना तुरुंगवास झाला त्यांना देण्यात येणारी रक्कम वेगळी आणि सहा महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात  राहिलेल्या सत्याग्रहींसाठी वेगळी रक्कम देण्यात येणार असून रकमेची आकडेवारी ह्या महिन्याअखेर सुनिश्चित करण्यात येणार आहे.

या संघर्षामुळे तुरुंगात राहिलेल्या ज्या सत्याग्रहींचे निधन झाले आहे,त्यापैकी सत्याग्रही पुरुषाच्या निधनोत्तर त्याचा पत्नीला आणि सत्याग्रही महिलेच्या निधनोत्तर तिच्या पतीला ही पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच  सर्व पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या महिनाअखेरपर्यंत यासंबंधी सर्व माहिती गोळा करून वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे  पाटील यांनी सांगितले.

0000

Previous articleधर्मा पाटील जमीन मोबदला प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी
Next articleऔरंगाबाद येथिल कचरा प्रश्न उद्या मार्गी लागणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here