वंदना चव्हाण यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

वंदना चव्हाण यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यसभेसाठी खासदार वंदना चव्हाण यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आज विधानभवनामध्ये राज्यसभेसाठी खासदार वंदना चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

गेल्या आठवडयामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आज हा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेमधील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार दिप्ती चव्हाण, आमदार श्रीमती सुमन पाटील, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार विक्रम काळे, आमदार ख्वाजा बेग, आमदार संजय कदम, आमदार राहुल जगताप,आमदार दत्ता भरणे, आमदार सुरेश लाड आदी उपस्थित होते.

काल शिवसेनेकडून विद्यमान खासदार अनिल देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपने तीन पैकी एका उमेदवाराचे नाव काल उशीरा जाहीर केले असून, केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Previous articleआमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?
Next articleलाळ्या-खुरकत लसीवरुन पुन्हा एकदा महादेव जानकरांवर माफी मागण्याची नामुष्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here