प्रकाश जावडेकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

प्रकाश जावडेकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर हे उद्या शुक्रवारी दुपारी बारा वाजता राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कालच तीन पैकी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.मात्र अजून दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी असून,लवकरच या दोन नावांची घोषणा केली जाईल.

राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या २३ मार्च रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये महाराष्ट्रामधील सहा जागांचा समावेश आहे. वंदना चव्हाण( राष्ट्रवादी ) ,अनिल देसाई  ( शिवसेना), यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर काॅग्रेस पक्षाने अजून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली तरी माजी मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपने कालच केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे तर नारायण राणे यांचे तळ्यातमळ्यात चालले असल्याने इतर दोन उमेदवारांच्या नावाचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शहा हे

राज्यसभेच्या निवडणूकीसाठी ५ मार्चला अधिसूचना जारी होणार करण्यात आली असून, १२ मार्च उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
१३ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर; १५ मार्च अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. सहा जागांसाठी जास्त उमेदवारी अर्ज आल्यास २३ मार्च मतदान घेण्यात येणार आहे.परंतु सध्या प्रत्येक पक्षाचे संख्याबळ बळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

Previous articleराज्याच्या कृषीविकास दरातील घट व कर्जाचा बोजा गंभीर
Next articleउध्दव ठाकरेंच्या “स्वाभिमानावर” राज ठाकरेंचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here