उध्दव ठाकरेंच्या “स्वाभिमानावर” राज ठाकरेंचा निशाणा
मुंबई : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने नाराज झालेले चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आपले राजीनामे देत केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.
शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा अनेक वेळा इशारा दिला आहे तर खा.संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय केव्हाच घेतला असल्याचे वक्तव्य केले आहे.तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याने तेलगु देसम पक्षाच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे देत केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर बोचरी टिका करणारे व्यंगचित्र रेखाटले आहे. सतत राजीनामे आणि सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देणा-या शिवसेनेचा हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी आज स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान या मथळ्याखाली शिवसेनेवर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.
”हॅ, यात कसला अलाय ‘मर्द’पणा? त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून अपमान गिळूनवर सरकारला धमक्या देऊन दाखवा” असा मथळा या व्यंगचित्रात रेखाटून उध्दव ठाकरे यांच्या शेजारी खा. संजय राऊत रेखाटून ही सर्व परस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका खिडकीतून पहात असल्याचे दाखवण्यात आले आहे.