राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करणार

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करणार

मुंबई : राज्याचा या वर्षीचा म्हणजेच २०१८-१९ चा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर; राज्यमंत्री दिपक केसरकर हे विधानपरिषदेत आज दुपारी २ वाजता सादर करतील.

र्अथसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सकाळी सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज दुपारी २ वाजता सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. सध्याची आर्थिक चणचण पाहता अर्थमंत्र्यांना हात आखडता घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे. मुनगंटीवार हे आपला चौथा अर्थसंकल्प सादर करतील.

Previous articleआघाडी सरकारच्‍या काळातच शैक्षणिक भूखंडाचे श्रीखंड खाल्‍ले !
Next articleबालभारतीच्या पाठयपुस्तकांचे कॉपीराईट राज्य सरकार घेणार