पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून १३०० कोटी

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्राकडून १३०० कोटी

मुंबई : पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोसाठी केंद्र सरकारने व्हायेबिलिटी गॅप फंडिंग म्हणून १ हजार ३०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य्य मंजूर केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा,आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (DBFOT) या तत्त्वावर उभारणी करण्यात येत आहे. पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) त्याची अंमलबजावणी करण्यास अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. या मेट्रो मार्गाची लांबी २३.३ कि.मी. राहणार असून या प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी रुपये आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या १ हजार ३०० कोटी रुपये निधीमुळे आता या प्रकल्पाला आणखी गती मिळणार असून पुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या या मोलाच्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांनी विशेष आभार मानले आहेत.

Previous articleअर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच!
Next article‘अर्थ’हीन अर्थसंकल्पः खा. अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here