विराट “किसान मोर्चा” उद्या विधानभवनावर धडकणार
मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्त्वाखाली नाशिकहून विधानभवनाच्या दिशेने निघालेला लॉंगमार्च आता मुंबईमध्ये पोहचला असून, हा लाखोंचा मोर्चा उद्या सोमवारी विधानभवनावर धडक देणार आहे.
नाशिकपासून सुरु झालेला हा मोर्चा उद्या सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे. सुमारे ४० हजारो शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चात सहभागी झाले आहेत.उद्या यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सरकारी धोरणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याने या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी किसान सभेने मोर्चा काढला आहे.ठाण्यातुन हा मोर्चा आता मुंबईत पोहचला असून, विक्रोळी आणि सायन येथिल सोमय्या मैदानावर हा मोर्चा थांबेल. त्यानंतर आज रात्री हा मोर्चा आझाद मैदानावर पोहचेल.
उद्या सोमवारी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे. या मोर्चात विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार असून, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीने या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात. शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्यावी. शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या. स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा. वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा, अशा मागण्या किसान मोर्चाच्या आहेत.