मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतक-यांशी चर्चा करावी
अशोक चव्हाण
मुंबई : आपल्या विविध मागण्यासाठी किसान सभेच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चाला काॅग्रेसने पाठिंबा दिला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हट्टीपणा सोडून शेतक-यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
शेतक-यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतक-यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतक-यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतक-यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असे ट्विट खा.चव्हाण यांनी केले आहे.