किसान मोर्चाचा धसका : चर्चा करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत
मुंबई : किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकार्यांची एक उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.शेतक-यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी सहा सदस्यीय मंत्र्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
आज झालेल्या बैठकीत आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.शेतक-यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यामध्ये एकूण ६ मंत्री असतील. याध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा समावेश आहे.उद्या दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.