भाजपची केरळच्या व्ही.मुरलीधरन यांना उमेदवारी

भाजपची केरळच्या व्ही.मुरलीधरन यांना उमेदवारी

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिस-या जागेसाठी भाजपने केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली.आहे.तिस-या जागेसाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा होती.

भाजपने राज्यसभेसाठी तिस-या जागेसाठी नाव जाहीर केले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याने भाजपने महाराष्ट्राच्या कोट्यातून केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी दिली आहे. मुरलीधरन उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे उद्या अर्ज दाखल करणार आहेत तर केंद्रियमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

Previous articleकाॅग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी
Next articleलाँग मार्चच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर सरकार भस्मसात होईल!