राज्यसभेसाठी कुमार केतकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यसभेसाठी कुमार केतकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

काॅग्रेसचे राज्यसभा उमेदवार ज्येष्ठ पत्रकार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे आ. गणपतराव देशमुख, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आसिम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते.

Previous articleमुख्यमंत्र्यांना मोर्चाची ताकद बघून धडकी भरली आहे 
Next articleनारायण राणे आणि व्ही.मुरलीधरन यांचे उमेदवारी अर्ज दाखल