नारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ?

नारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ?

शिवसेना आमदार अनिल परब यांचा भाजपला सवाल

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी भाजपचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असतानाच शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी त्यांच्या उमेदवारीवरून अनेक प्रश्न उपस्थित करून भाजपलाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायण राणे यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. राणे यांनी कोणत्या पक्षाकडून राज्यसभेचा अर्ज भरला आहे, त्यांना भाजपने उमेदवारी दिली असेल तर त्यानी भाजपचे सदस्यत्व कधी स्विकारले ? सदस्य असतील तर त्याची काही पावती आहे का ? नेमका कोणत्या मार्गाने त्यानी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले ? जर नारायण राणे यानी सदस्यत्व स्विकारले असेल तर त्यानी त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचा राजीनामा दिला का ? कारण एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत नाही आणि जर दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करुन घ्यावा लागते तरच त्याला पक्षाला बी फॉर्म देता येतो असा नियम आहे. त्यामुळे नारायण राणे याना भाजपने सदस्यत्व कधी दिले ? जर दिले नसेल तर त्यांना राज्यसभा उमेदवारी कशी दिली ? असे अनेक सवाल करत शिवसेना आमदार आणि प्रवक्ते अॅड. अनिल परब यानी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Previous articleसरकारने सिंचनाची खरीखुरी आकडेवारी जाहीर करण्याचे मुंडेंचे आव्हान !
Next articleराज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here