राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता

राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरण, हलक्या सरींची शक्यता

शेतकरी बांधवांनी शेतमालाची काळजी घ्यावी

मुंबई : दक्षिण अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे उद्या दि. १५  व १६ मार्च रोजी राज्यातील कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि तापमानात घट होणार असून, या दोन दिवसात हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

या काळात गारपीट अथवा वादळाची शक्यता नसून शेतकऱ्यांनी कापणी केलेला शेतमाल उघड्यावर ठेऊ नये, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी केले आहे. या काळात बाजारात विक्रीसाठी आणलेल्या मालाची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. ढगाळ  वातावरण आणि हलक्या सरींमुळे गहू आणि आंबा मोहोर यावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन शेतमालाचे नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleनारायण राणे नेमके कोणत्या पक्षाचे उमेदवार ?
Next articleकंत्राटी कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी सरकारने बोलावली बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here