राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध

मुंबई : भाजपने आपल्या चौथ्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपच्या उमेदवार विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) हे बिनविरोध निवडून आले आहेत.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती.भाजप आपल्या चौथ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा होती.राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात अर्ज दाखल झाल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. पण आज भाजपच्या चौथ्या उमेदवार विजया रहाटकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला आहे.प्रकाश जावडेकर, नारायण राणे व व्ही. मुरलीधरन (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) हे बिनविरोध निवडून आले आहेत.याची अधिकृत घोषणा २३ तारखेला करण्यात येईल.

Previous articleराज्यातील सर्व बसस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार
Next articleराज्यात तब्बल वीस नवीन वसतिगृहांसह निवासी शाळांच्या बांधकामास मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here