आगामी काळात राम मंदिराच्या मुद्यावरून हिंदू-मुस्लिम दंगली घडविल्या जातील !
मुंबई : निवडणुकीनंतर राम मंदिर व्हावे , भाजपाने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये.राम मंदिर निश्चित व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त करतानाच , पुढच्या काही महिन्यामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील तशी माहिती मला मिळाली आहे असा गौप्यस्फोट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील पाडवा मेळाव्यात केला. त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपला असं ज्यांना वाटतं, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा जिवंत महाराष्ट्र पाहावा
मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला मॉनेटर आहेत; शिक्षकांचा आवडता, पण विद्यार्थ्यांचा नावडता.दलाल राज्य करत आहेत राज ठाकरे यांचा गंभीर आरोप.
एवढी मोठी चूक केल्यावरही सरकारबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्याविरोधात काही लिहून येत नाही. देशातला मीडिया आणि वर्तमानपत्रं. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने भरून येणार. विलासराव देशमुख ताजमध्ये गेले, त्यात राम गोपाल वर्मा होते. केवढी टीका. या सरकारकडून घडणाऱ्या गोष्टींवर ब्र काढायला तयार नाही.
विश्व दीपक ये न्यूज प्रॉड्युसरने राजीनामा दिला. हा सगळा मीडिया सरकार नियंत्रित करतोय. काय बातम्या द्यायच्या, कशा द्यायच्या. सगळ्या मालकांना सांगितलं गेलंय. काही ठिकाणी पत्रकार, संपादकांना काढून टाकल. मोदी आणि शहांनी सांगितले. त्यांच्या विरोधात बातम्या दिल्यात, तर जाहिराती बंद करून टाकणार.
कोणत्या देशात जगतोय आपण? ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितक्या वेळा टीव्हीवर दाखवली, तितक्या वेळा न्यायमूर्ती लोयांच्या खुनाच्या बातम्या दाखवल्या का? आता १०० न्यायाधीशांच्या बदल्या केल्या.
न्यायाधीशांवरही सरकारचा दबाव. हे सगळं तंत्र अॅडॉल्फ हिटलरच्या पुस्तकात मिळेल. जे विरोधात आहेत, त्यांना संपवून टाकायचं किंवा घाबरवायचं. या गोष्टींसाठी माझा मोदींवर राग.
जे मेट्रोचे काम चालू आहे, त्याच्या विरोधात बातम्या द्यायच्या नाहीत, असं सगळ्यांना सांगितलंय. याला लोकशाही म्हणणार आपण? हे अच्छे दिन?
महाराष्ट्रासारख एक राज्य गप्प बसलय. वाट्टेल ते आकडे सांगतात. नितीन गडकरींना तर हौसच आहे. साबणाचे फुगे उडवत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. ते आले की करा ‘फू’
बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकार २५ टक्के रक्कम देणार आहे, म्हणजे आणखी कर्ज काढावं लागणार आणि राज्य पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली जाणार
ज्या ज्या देशांचे प्रमुख भारतात आले, त्यांना अहमदाबादेत नेलं, इतर शहरांमध्ये का नेत नाहीत?
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कामाची पद्धत हिटलरच्या स्टाईलची
सध्याच्या सरकारमध्ये बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा झाला आहे. पण, त्याच्या बातम्या बाहेर येत नाहीत .
धर्मा पाटीलांची जमीन २०४ गुंठे आहे तिथे त्यांना ४ लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी ७४ गुंठे आहे, तिला कोट्यवधी रुपये दिले गेले .
बेरोजगारांची नोंदणी करायची नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढलाय, यामुळे भविष्यात भारतात किती बेरोजगार आहेत याची माहितीच मिळणार नाही
महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी नाही, बाहेरुन येतायत त्यांना घरं दिली जात आहेत, महाराष्ट्रात सुखी कोण आहे?