रेशन दुकानदारांना पगार सुरु करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

रेशन दुकानदारांना पगार सुरु करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई :  राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नावर आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत या दुकानदारांच्या मागण्या मांडून त्यांना तात्काळ पगार सुरु करण्याची मागणी केली.

रेशन दुकानदार कालपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले असल्याने त्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्यासाठी मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडून सरकारचे लक्ष वेधले. रेशन दुकानदारांच्या अडचणी समजून न घेतल्यामुळे त्यांना आंदोलन करावे लागले आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेले नाहीत. एपीएल, बीपीएल कार्ड धारकांची एंट्री सर्व्हर मध्ये झालेली नसल्यामुळे रेशन दुकानदारांसमोर अडचणी उभ्या राहिल्या असल्याचे मुंडे म्हणाले.

रेशन दुकानदार सरकारी यंत्रणेची अंमलबजावणी करण्यासाठी तयार आहेत. मात्र सरकारने त्यांना थोडा वेळ दिला पाहीजे. बायोमेट्रिक साठी लगेच सक्ती न करता थोडा वेळ द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. उद्या जर रेशन दुकानदार अधिक काळासाठी संपावर गेले तर बीपीएल, एपीएल धारकांना रेशन मिळण्याची पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या मागण्याकडे संवेदनशील भूमिकेतून बघावे, असे ते म्हणाले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला.  विषय गंभीर असल्यामुळे इतर आयुधाखाली चर्चा उपस्थित करण्याचे निर्देश दिले.आज सकाळी दादर येथे झालेल्या रेल्वे अॅप्रेटिशिप विद्यार्थ्यांचे झालेले आंदोलन हे सरकारच्या इंटेलिजन्सचे अपयश आहे. हा विषय जरी रेल्वे मंत्रालयाशी निगडीत असला तरी मुंबईची जनता या आंदोलनामुळे वेठिस धरली गेली. हे दुर्दैवी आहे. सरकारच्या गृहविभागाचे हे अपयश असून सरकारने सभागृहात याबद्दल निवेदन करावे, अशी मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते  मुंडे यांनी केली.

Previous articleपालकांनी तक्रार केल्यास खाजगी शाळांमधील भरमसाठ फी विरुध्द निर्णय घेणार 
Next articleअंगणवाडी सेविकांना सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here