बीड जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके निलंबित

बीड जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके निलंबित

मुंबई : अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून तक्रार केल्याचा राग मनात धरून आमदार अमरसिंह पंडित व त्यांच्या स्वीय सहाय्यकाविरुद्ध खोटी तक्रार देणा-या बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी आर. शेळके यांस आज विधान परिषदेत निलंबित करण्यात आले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सभागृहात सदस्यांनी जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत काय ? अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी आली आहे असा सवाल उपस्थित करताना आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करणा-या बीड जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यास निलंबित करण्याची मागणी केली. महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत आजच्या आज या अधिका-यास निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

Previous articleशिक्षक भरती केव्हा करणार ?
Next articleराज्यातील मंत्रीच गुंडांना पोसतात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here