“ताई, पेढा घ्या! “तुमच्यामुळे सेवानिवृत्ती टळली”
मुंबई : “ताई, पेढा घ्या! तुमच्यामुळे आमची सेवानिवृत्ती टळली”.
‘३१ मार्चला सेवानिवृत्त होत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी महिला व बाल विकासमंत्री पंकजाताईं मुंडेंना पेढे भरवून भावोद्गार’ काढले.
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी, नुकतेच अंगणवाडी सेविकांच्या सेवा निवृत्तिचे वय ६५ वर्षे करून संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे आनंदीत झालेल्या, सातारा जिल्ह्यातील माण येथील, सेवानिवृत्तिच्या उंबरठ्यावरील, छाया परशुराम शिपटे व अन्य अंगणवाडी सेविकांनी आज ‘रॉयलस्टोन’ निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन पेढे वाटून त्यांचे आभार मानले. कोणतीही संघटना किंवा राजकारणाच्या पलीकडील सेविकांच्या निरागस प्रेमाने सुखावलेल्या, मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना चांगली सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.