मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच आज बीड जिल्ह्यातील माजलगावचे गुलाब शिग्रे या व्यक्तीने मंत्रालयासमोर अंगावर राॅकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथिल गुलाब शिग्रे (५६ ) या व्यक्तीची जमीन स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हडप केल्यामुळे याची तक्रार करण्यासाठी आज मंत्रालयात आले होते. त्याला मंत्रालयात प्रवेश करण्यापासुन पोलीसांनी हटकले असता या व्यक्तीने मंत्रालयासमोर अंगावर राॅकेल ओतुन घेण्याचा प्रयत्न केला मात्र सुरक्षेवर तैनात असणा-या पोलीसांनी त्वरित ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गुलाब शिग्रे यांना मरिन ड्राईव्ह पोलीसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या घटनेने खळबळ उडाली आहे.

Previous article…अन अजित दादा रविंद्र चव्हाणांची फिरकी घेतात, तेव्हा!
Next articleभ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला !