राज्यात मुलींचा जन्मदर घटला

राज्यात मुलींचा जन्मदर घटला

मुंबई, दि. २३ राज्यात गतवर्षी झालेल्या नागरी परिक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा ९०४ एवढा जन्मदर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रुणहत्या रोखण्यासंदर्भात सरकार प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. ४१६ संशयीत सोनोग्राफी केंद्रावर लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली.

विधानसभेत शिवसेना आमदार सुनिल शिंदे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.त्यास उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, नीती आयोगाच्या अहवालानुसार २०१२ ते २०१४ या वर्षांत देशातील २१ प्रमुख राज्यांपैकी १७ राज्यात मुलींच्या जन्मदरात घट झाली असून, महाराष्ट्र राज्याचा त्यात समावेश आहे. यानंतर नागरी सर्व्हे झाला यानुसार राज्यात दर हजारी ९०४ इतकी मुलींची संख्या असल्याचा अहवाल आला आहे.

Previous articleभ्रष्टाचार व कायदा सुव्यवस्थेवरची चर्चा टाळण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी पळ काढला !
Next articleमागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here