“एल्गार मोर्चाला” शुभेच्छा मात्र पाठिंबा नाही!

“एल्गार मोर्चाला” शुभेच्छा मात्र पाठिंबा नाही!

मुंबई : भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानावर संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या एल्गार मोर्चात आरपीआय पक्ष सहभाही होणार नाही.या एल्गार मोर्चाला शुभेच्छा आहेत, मात्र पाठिंबा नाही असे वक्तव्य केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

आरपीआयचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, भारिपचे बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या एल्गार मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत, मात्र पाठिंबा नाही. मी केंद्रात मंत्री झाल्याने त्यांना आवडत नसेल तरी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही समाज म्हणून एकच असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या एल्गार मोर्चाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केला आहे. या मोर्चात ब्रिगेड आपल्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण तयारीनिशी आणि ताकदीनिशी उतरणार असल्याचे, ब्रिगेडचे पुणे अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी म्हटले आहे.

Previous articleसंभाजी भिडेंच्या अटकेसाठी आज मुंबईत “एल्गार” मोर्चा
Next articleसरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ?