भीमा कोरेगावची घटना घडवण्यास सरकारलाच रस होता का ?

भीमा कोरेगावची घटना घडवण्यास सरकारलाच रस होता का ?

जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई : भीमा कोरेगावची घटना घडली त्यादिवशी त्या ठिकाणी मंत्रिमंडळातील एकही मंत्री गेले नाहीत तर त्यापूर्वीच जावून आले होते.त्यामुळे तिथे काय होणार हे सरकारमधील लोकांना माहिती होती. त्यामुळेच सरकारने याकडे दुर्लक्ष केले अशी शंका निर्माण होत असल्याने सरकारलाच ही घटना घडवण्यात रस होता का ? असा सवाल राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. या घटनेची सर्व जबाबदारी सरकारची आहे. गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांची आहे असेही ते म्हणाले.

जयंत पाटील यांनी राज्यात वाढलेली गुन्हेगारी आणि गुन्ह्यांची माहिती देतानाच राज्यात घडलेले भीमा कोरेगाव दंगल प्रकरण सरकारने कशापध्दतीने हाताळले याचा खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहखाते गुन्हेगारी रोखण्यात किती अपयशी ठरत आहे हे स्पष्ट केले.याशिवाय त्यांनी सभागृहात अनेक मुद्यांना हात घालत सरकारच्या कारभाराची पोलखोल केली.या राज्यात आपण सुरक्षित नाही याची महाराष्ट्रातल्या लोकांना आता खात्री पटू लागली आहे. क्राईम रेटमध्ये आता आपले राज्य पुढे जावू लागले आहे. राज्यात गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आता ऑनलाइनही गुन्हा दाखल करू शकता मात्र बीड जिल्ह्यातील गायकवाड नावाच्या महिलेचा पोलीस स्टेशनमध्ये जावूनही बलात्काराचा गुन्हा नोंदवून घेतला गेला नाही. औरंगाबाद खंडपीठात गेल्यानंतर तिचा गुन्हा नोंदवून घेतला गेला राज्यातील गृहखाते कशापध्दतीने काम करत हे यातून स्पष्ट होते आहे असे पाटील म्हणाले.

अश्विनी बिंद्रे प्रकरण गंभीर असून, पोलीस सहकाऱ्यांनीच त्यांची हत्या केली. नाशिकला जिवंत काडतुसे सापडली असे तीन चार प्रकार घडले. अहमदनगरमध्ये पार्सल बॉम्ब सापडले. या घटना रोज वाढत आहेत. सरकारने यावर काही उपाय करायला हवा असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले , देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र हे पेज फेसबुकवर चालते त्यावरून राजकीय नेत्यांची मानहानी केली जाते. लोकांना ट्रोल केले जाते. मुख्यमंत्र्यांनी या पेजबाबत खुलासा करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.मुख्यमंत्री म्हणाले होते की, नागपूर शहरात सीसीटीव्ही लावू आणि नागपूर हे सुसज्ज शहर बनवू पण नागपूर गुन्ह्यात खुप पुढे जात आहे.

निरव मोदी प्रकरण गाजले, नागपूरचे बनावट पासपोर्ट प्रकरण गाजले, नागपूरहून ५० मुलं ब्रिटनमध्ये जातात आणि तिथे गायब होतात. याने स्पष्ट होतं की पोलिसांचा कारभार किती ढिसाळ आहे. असे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत याची आठवण जयंत पाटील यांनी सरकारला करुन दिली. सातारा जिल्ह्यात तर वेबसाईट हॅक करून लोकांनी सरकारी जमीन हडपली. या सरकारला ऑनलाइनची फार आवड आहे. गुन्हेगारांनी ऑनलाईनच सरकारला गंडा घातला. घाटकोपर येथील हनुमान नगरात एसआरए योजना राबवली जात आहे. मात्र गुंड तिथे हैदोस घालतात. महिला हैराण झाल्या आहेत त्यांनी पत्र लिहिले आहे जर काही बरं वाईट झाले तर सरकार त्याला जबाबदार असेल असे त्या महिल़ाचे म्हणणे आहे याविषयाकडेही जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

Previous article“लग्न झाले का”‘ हा प्रश्न महादेव जानकरांना विचारायला हवा : धनंजय मुंडे
Next articleआज विधानपरिषदेत गाजणार २ हजार कोटींचा तुरडाळ घोटाळा  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here