मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिलचा मुहूर्त !
मुंबई : राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारचा विस्तार होण्याची दिड वर्षे सुरू असलेली आता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आता या मंत्रिमंडळ विस्ताराला एप्रिल महिन्याचा मुहूर्त मिळाल्याची चर्चा आहे.
हिवाळी अधिवेशनानंतर शांत झालेली मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. एप्रिल महिन्यामध्ये या विस्ताराला मुहूर्त मिळणार असल्याचे जाणकार सांगत असल्याने संभाव्य नावांच्या चर्चेबरोबर कोणा कोणाला डच्चू देणार याचे आडाखे बांधले जात आहेत. राज्यातील फडणवीस सरकारचा आगामी निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा विस्तार असेल. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास केवळ भाजपाच्या तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. जागा वाटपानुसार भाजपाचे ३० तर शिवसेनेचे १२ मंत्रीपदे मंत्रिमंळात आहेत. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना तर ; विदर्भातील एका कॅबिनेट मंत्र्याला वगळले जाण्याची शक्यता आहे.