डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते अशी घोषणा भाजप करू शकते
मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकाच्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते अशी घोषणा मोदी सरकार करू शकते असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष नेते प्रकाश आंबेडकर यांनी लगावला केला आहे.
उत्तर प्रदेश सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामध्ये त्यांच्या वडीलांचे रामजी हे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. डाॅ .बाबासाहेब हे भीमराव रामजी आंबेडकर अशी सही करत असल्याचा दाखला देत उत्तर प्रदेश सरकारने भीमराव रामजी आंबेडकर असे नाव यापुढे लिहिले जाईल असा निर्णय घेतला आहे. केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने ही खेळी केली असल्याची टीका आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे.हा आदेश आत्ताच का दिला असा सवाल उपस्थित करून राम मंदिर प्रश्नावर भाजप सरकारला अपयश आल्यानेच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा त्यांनी केला.डाॅ.बाबासाहेब हे मराठी मध्येच सही करत, “भीमराव रामची आंबेडकर” अशी सही करताना ते बी. आर. आंबेडकर अशी सही करत असे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.