युवा सेनेची कमान लवकरच तेजस ठाकरे यांच्या हाती !

युवा सेनेची कमान लवकरच तेजस ठाकरे यांच्या हाती !

मुंबई : आजच्या दैनिक सामनातील एका शुभेच्छा जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंचा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून, अनेक तर्क-वितर्क वर्तवण्यात येत आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या पहिल्या पानावर आज सिनेट निवडणूकीत युवा सेनेच्या विजयाची शुभेच्छा देणारी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमध्ये तेजस ठाकरेंची छबी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांचाही या जाहिरातीत फोटो आहे. सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या शुभेच्छा जाहिरातीत तेजस ठाकरे यांचाही फोटो झळकल्याने अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे. आदित्य ठाकरे हे अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या युवा सेनेचे नेतृत्व करत आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीत युवा सेनेने सर्वच्या सर्व दहा जागा जिंकत नवा इतिहास घडवला आहे.त्यानंतर आज ही जाहिरात प्रसिध्द झाली आहे. आदित्य ठाकरे हे लवकरच शिवसेनेच्या मुख्य राजकारणात सक्रिय होतील आणि युवा सेनेची जबाबदारी तेजस ठाकरे यांच्यावर सोपवली जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Previous articleराज्यातील लाखो बेरोजगारांचे काय ?
Next articleसीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका