सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका
राज ठाकरे यांचे पालकांना आवाहन
मुंबई : सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.सीबीएसईच्या पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे पेपर फुटल्याने पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.दहावीचा गणित आणि इयत्ता बारावीचा अर्थशास्त्र या विषयाचा पेपर फुटल्याने या परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी पालकांना केले.मनसे सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
संबंधित विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्या हा सरकारचा हलगर्जीपणा असून,स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावता, सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यामध्ये या मुलांचा काय दोष, त्यांनी पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला का बसायच अस् सवाल राज ठाकरे यांनी करून, कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका असे पालकांना आवाहन आहे. तुम्ही निर्णयावर ठाम राहा असेही ते म्हणाले.