गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी खा.राजीव सातव यांची नियुक्ती
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउंड असलेल्या गुजरात काॅग्रेस प्रभारीपदी मराठी खासदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचे खासदार आणि युवा नेते राजीव सातव यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून आज एक परिपत्रक काढून याबाबत घोषणा करण्यात आली. “खासदार राजीव सातव यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्त करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.” असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळी खा. राजीव सातव यांनी सह-प्रभारी म्हणून काम पाहिले होते. गुजरात मध्ये काँग्रेसला उभारी देण्याची जबाबदारी राजीव सातव यांच्या रुपाने एका मराठी आणि तरूण नेत्यावर आली आहे.