कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ
मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबईः राज्यातील शेतक-यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदत वाढ देण्यात आली असून, आज ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आज ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली ही मुदत आता १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच वन टाइम सेटलमेंटची मुदतही ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.