राज ठाकरे यांचा पुन्हा मोदी शहांवर निशाणा
मुंबईः शिवाजी पार्क मैदानावर मोदी मुक्त भारताची साद घालणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या गाजत असलेल्या चेंडूशी छेडछाड प्रकरणाशी सांगड घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर आपल्या कुंचल्यातुन निशाणा साधला आहे.
गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदीमुक्त भारताची साद घातली होती. त्यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना आपल्या कुंचल्याने फटकारले आहे. सध्या चेंडूशी छेडछाड केल्याचे ऑस्ट्रेलियाच्या क्रिक्रेटरांचे प्रकरण चांगलेच गाजत असतानाच त्याचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी मोदी-शहांमधील ‘दिल्लीच्या ड्रेसिंग रूममधील चर्चेच्या नावाखाली चांगलीच खिल्ली उडवली आहे.
गोतमभाईला सांगून ऑस्ट्रेलियापासून पोलिस पेपर ( पाॅलिश पेपर ) मांगवून घासून पायला ( पाहिला) पन हे बोल ( चेंडू ) स्विंग होएलस वाटात नाही ! असे पंतप्रधान अमित शहा यांना सांगत आहे तर ; अमित शहांच्या हातात चेंडू रेखाटुन त्यावर २०१४ चे जुमले असे नमूद केले आहे.