खासदारकी म्हणजे गडचिरोलीला बदलीची शिक्षा समजू नये !

खासदारकी म्हणजे गडचिरोलीला बदलीची शिक्षा समजू नये !

खा.नारायण राणे

मुंबई : राज्यातुन राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या सहा खासदारांचा आज शपथ विधी पार पडला. या नंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी आपली राज्यसभेतील खासदारकी म्हणजे गडचिरोलीला बदलीची शिक्षा,असा समज करून घेवू नये असे स्पष्ट केले.

महाराष्ट्रातून बिनविरोध निवडून आलेल्या ६ राज्यसभा खासदारांचा आज दिल्लीत शपथविधी पार पडला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी हिंदीतून शपथ घेतली.तर शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली.

शपथविधी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे म्हणाले की,आपली राज्यसभेतील खासदारकी ही गडचिरोलीला बदलीची शिक्षा आहे,असा समज कोणीही करून घेऊ नये, असे स्पष्ट केले. राज्याच्या राजकारणात आपणाला जास्त रस असूनही दिल्लीला यावे लागले असा प्रश्न खा. राणेंना विचारण्यात आला असता राणे म्हणाले की, मी राज्यातील सर्वच पदे भुषविली आहेत. त्यामुळे माझा राज्यातील कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता मला राज्यसभेत काम करायला आवडेल. माझी खासदारकी म्हणजे गडचिरोलीची शिक्षा नव्हे. या ठिकाणाहून देशाचा कारभार चालतो. त्यामुळे मी दिल्लीत येण्याबाबत समाधानी आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राणेंनी सांगितले.

Previous article१ मे २०१८ पर्यंत एस.टी. कामगारांचा वेतन करार करणार
Next articleशिवसेना ही गांडुळाची अवलाद