पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राज ठाकरेंचे मोदी शहांवर फटकारे
मुंबई : मोदीमुक्त भारताची हाक देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता पेट्रोल आणि डिझेलच्या उच्चांकी दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांवर कुंचल्यातुन निशाणा साधला आहे.
या दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य जनतेला झळा सोसाव्या लागत आहेत.हा महत्वाचा धागा पकडून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक व्यंगचित्र आपल्या फेसबुक वाॅलवर प्रसिध्द केले आहे. ये व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.एक सामान्य नागरीक गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी उभा आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका सामान्य नागरिकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरताना या व्यंगचित्रामध्ये रेखाटले आहे, तर भाजपाध्यक्ष अमित शहा त्यांच्या शेजारी पैसे घेण्यासाठी उभे असल्याचे दाखवले आहे. जगात तेलाच्या किंमती खाली घसरल्या असताना सुद्धा भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे असा संदेश राज ठाकरे यांनी देवून,एक सर्वसामान्य नागरीक डोक्याला हात लावून बाबांनो हेच ते अच्छे दिन असे म्हणत आहे. पंतप्रधान सर्वसामान्य नागरीकाला पेट्रोल भरताना ” हैडस अप निकाल पैसा” असे म्हणताना ये व्यंगचित्र दाखवले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या या व्यंगचित्रातुन भाजपा सरकार सर्वसामान्यांना लुटत असल्याचे दाखवले आहे.